जयंत पाटील म्हणतात, शैलजा, तुम्ही खऱ्या अर्थाने..

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कोणत्याकोणत्या कारणेन सातत्याने चर्चेत असतात. त्यांची राजकीय वक्तव्यं आणि भूमिका असोत किंवा एखाद्या नेत्याविषयी, घटनेविषयी केलेली मिश्किल टिप्पणी असो जयंत पाटील नेहमीच लक्ष वेधून घेताना दिसतात. आतादेखील जयंत पाटील चर्चेत आले आहेत, मात्र ते वेगळ्याच गोष्टीमुळे.
जयंत पाटील यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेचा विषय झाली आहे. जयंत पाटील यांनी त्यांची पत्नी शैलजा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये जयंत पाटील आणि शैलजा पाटील यांची तरुणपणीची छायाचित्रं आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यांच्या या पोस्टवर शुभेच्छा आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. जयंत पाटील यांनी या पोस्टमध्ये आपल्या पत्नीचे आभार मानले आहेत. माझ्या यश-अपयशात, सुख-दुःखात नेहमीच साथ दिलीत, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खांद्याला खांदा लावून माझ्या संगिनी बनलात. शैलजा, तुम्ही खऱ्या अर्थाने माझी सहचारिणी ठरलात. तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने