नुपूर शर्मा प्रकरण, कतारने केली माफीची मागणी

मुंबई : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद अरब देशांमध्ये उमटू लागले आहेत. कतारमधील सरकारने भारताचे राजनैतिक अधिकाऱ्यांकडे एक पत्र देत भारत सरकारने या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी केली. कतारच्यावतीने दीपक मित्तल यांना देण्यात आलेल्या निवेदनात नुपूर शर्मांच्या वक्तव्याबद्दल निषेध आणि नाराजी व्यक्त केली आहे. कतारचे परराष्ट्र मंत्री सुल्तान बिन साद अल मुरैखी यांनी दीपक मित्तल यांच्याकडे निवेदन दिलयं. नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांना हटवण्यात आल्याच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं आहे. मात्र, त्यासोबत भारत सरकारनं या वक्तव्यांचा निषेधकरावा आणि माफी मागावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. अल्पसंख्यांकांविरोधातील वक्तव्यांमुळं हिंसा वाढू शकते, असं ते म्हणाले. जगभरातील २ अब्ज मुस्लीम मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांवर चालतात. धार्मिक द्वेष पसरवणारी ही वक्तव्य जगभरातील मुस्लीम समुदायाचा अपमान असल्याचं कतारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कतार सर्व धर्मांच्या, सर्व देशांच्या नागरिकांच्या प्रती सहिष्णुता, समान मूल्यांचा स्वीकार करते, असेही त्यात स्पष्ट केलयं. नेमकं काय आहे प्रकरण ? एका टीव्ही डिबेटमध्ये मोहम्मद पैंगबर यांच्याविषयी नुपूर शर्मांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी भाजपने त्यांचं सहा वर्षांसाठी सदस्यत्व निलंबित केलं आहे. तर, नवीनकुमार जिंदल यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे. नवीनकुमार जिंदल यांनी पैंगबर यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केलं होतं ते नंतर डिलीट केलं होतं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने