राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? शरद पवार म्हणाले



ब्युरो टीम : महाराष्ट्रातील सरकार पडल्यावर राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, आपण भाजपसोबत जाणार का?, असा थेट सवाल पत्रकारांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारला. त्यावर 'जरा तरी सेन्सिबल प्रश्न विचारा. आम्ही विरोधी पक्षात बसू', असं थेट उत्तर पवारांनी दिलं आहे.

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक निकालात सत्ताधारी महाविकास आघाडीला मोठा जबर धक्का बसला आहे. राज्यसभेत सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची मतं फुटली तर विधान परिषदेत काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटली. विधान परिषदेत सेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले खरे पण एकनाथ शिंदे यांचा गट आधीपासूनच नाराज होता. निकाल लागण्याच्या काही तास अगोदर प्री-प्लॅनिंगनुसार एकनाश शिंदे आणि त्यांचे काही समर्थक आमदारांनी सुरत गाठलं. सकाळी ६ वाजण्याच्या सुमरास एकनाथ शिंदेंच्या बंडाचं वृत्त आलं आणि राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. याच भूकंपाच्या पार्श्वभू्मीवर शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.

ठाकरे सरकार व्यवस्थित चाललंय. पण काही लोकांकडून सरकार पाडण्याचं सातत्याने षडयंत्र सुरु आहे. ठाकरे सरकार बनविताना पण अशी बंडाळी महाराष्ट्राने पाहिली पण पुढे काय झढालं, हे देखील सगळ्यांनी पाहिलं. महाराष्ट्रात असं तिसऱ्यांदा घडत आहे. पण मला विश्वास आहे. की सगळं काही सुरळित आणि व्यवस्थित होईल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने