बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ , संजय राऊत यांचे ट्विट


ब्युरो टीम : “मुख्यमंत्री अत्यंत ग्रेसफुली पायउतार झाले. आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला आहे. दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले.. जनमानस देखील जिंकले. शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ. तुरुंगात जाऊ. पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ”, असं ट्विट खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 
उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उद्याच्या बहुमत चाचणीची गरजच संपुष्टात आली असताना भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या जनसंवादामध्ये बंडखोरांवर नाराजी व्यक्त करतानाच पुन्हा एकदा नव्याने शिवसेना भवनात बसून शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारची बाजू ठामपणे मांडणारे शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्वीटच्या माध्यमातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दोन ट्वीटसोबत एक फोटो देखील शेअर केला आहे.
या फोटोसोबत संजय राऊतांनी एक संदेश देखील पोस्ट केला आहे. “न्यायदेवता का सन्मान होगा! फायर टेस्ट.. अग्निपरीक्षा की घडी है..ये दिन भी निकल जाएंगे..जय महाराष्ट्र!” असा संदेश या ट्वीटसोबत संजय राऊतांनी लिहिला

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने