ब्युरो टीम : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय भूकंप आलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे २९ आमदार नॉट रिचेबल असल्याचं समोर येत आहे. एकनाथ शिंदे सध्या आमदारांसह सूरतमधील हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. अशात आता भाजपने एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असल्याची बातमी समोर येत आहे . समोर आलेल्या माहितीनुसार, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातही शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. तिन्ही जिल्ह्यातील बहुतांश आमदार, खासदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पडण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या ठाण्याला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे आमदार, खासदार एकनाथ शिंदेंसोबत -
ठाण्यातून स्वतः एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, कल्याण पश्चिमचे विश्वनाथ भोईर, अंबरनाथमधील बालाजी किणीकर, भिवंडी ग्रामीण येथील शांताराम मोरे, पालघर येथील अमित वनगा रायगड महाडमधील भरत गोगावले, कर्जतमधील महेंद्र थोरवे, अलिबागमधील महेंद्र थोरवे
ठाणे - खासदार राजन विचारे, कल्याणचे श्रीकांत शिंदे
टिप्पणी पोस्ट करा