हॅलो डॉक्टर, एकनाथ शिंदे यांनी का केला डॉक्टरांना फोन ? जाणून घ्या




ब्युरो टीम : महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या उलथापालथ सुरु आहे . महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतक्या पेचात गुंतलेले असतानाही शिवसेनेचे बंडखोर  नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या तब्येतीची चौकशी केल्याने त्यांचं कौतुक केलं जात आहे.
डोंबिवलीतील उपशहरप्रमुख राम मिराशी यांची २१ तारखेला अचानक तब्येत बिघडली. त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात मिराशी यांच्यावर उपचार सुरु आहेत. आपल्या शिवसैनिकाची तब्येत बिघडल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली. त्यानंतर २३ तारखेला सायंकाळी साडे पाच वाजता शिंदेंनी थेट एम्सच्या डॉक्टरांना कॉल केला. 'आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची काळजी घ्या, काही लागलं तर सांगा, माझा कार्यकर्ता जगला पाहिजे,'अशा सूचना त्यांनी डॉक्टरांना केल्या. एकनाथ शिंदे यांच्या या फोननंतर शिवसेनेचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख, मंगेश चिवटे यांनी याबाबत फेसबुक पोस्ट करत माहिती दिली.
राज्यात एवढ्या घडामोडी  सुरु असताना, या सर्व परिस्थितीत एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्त्यांशी किती जवळचे आणि आपुलकीचे संबंध आहेत याचं उदाहरण यानिमित्ताने पाहायला मिळालं

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने