पुणे : मान्सून अरबी समुद्रातच रेंगाळला असल्यामुळे राज्यात पावसाचे अद्याप काहीही संकेत नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस झाला. पण तोही हवा तसा झाला नाही.
हवामान खात्यातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकणात बुधवारपासून तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल. यावेळी वाऱ्यांचाही वेग वाढलेला असेल, असा अंदाज आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड येथे गुरुवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम आहे. तर औरंगाबाद आणि जालना येथे बुधवारी आणि गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारी पावसाचा जोर कमी होईल असाही अंदाज आहे. विदर्भात मंगळवार आणि बुधवारी वर्धा, चंद्रपूर, गोंदिया येथे तर गुरुवारी चंद्रपूर येथे उष्णतेच्या लाटेची लहर येऊ शकते. गोंदियामध्ये सोमवारी कमाल तापमान ४५.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. ब्रह्मपुरी येथे ४५.२ तर नागपूर येथे ४५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाचा पारा नोंदला गेला.
टिप्पणी पोस्ट करा