मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषणाची संधी नाही ? नेमकं काय घडलं

ब्युरो टीम: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आज देहूत शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. मात्र, या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी न दिल्यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे अजित पवार यांचे भाषण झाले नाही, यावरुन तर्क-वितर्क लावले जात आहेत. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आज देहूत शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षनेते फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित वारकऱ्यांना संबोधित केलं. मात्र मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी दिली गेली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर थेट पंतप्रधान मोदींचं भाषणासाठी नाव पुकारलं गेलं.
विशेष म्हणजे राज्यातल्या सरकारचे प्रतिनिधी, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादांची कार्यक्रमाला उपस्थित होती. पण असं असतानाही अजितदादांना बोलू न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


नेमकं काय घडलं ?


देहूत शिळा मंदिराचं पंतप्रधान मोदी यांच्या शुभहस्ते आज लोकार्पण झालं. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. प्रास्ताविक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ५ मिनिटांमध्ये भाषण केलं. त्यानंतर सूत्रसंचालकाने भाषणासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव पुकारलं. यावेळी मोदींनीही अजितदादांना बोलू द्या, असा इशारा केला. पण अजितदादांनी देखील 'तुम्ही बोला' म्हणत मोदींना खुणावलं. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने थेट मोदींचं नाव घेतल्याने त्यांना भाषणासाठी डायसकडे जावं लागलं. मात्र, या प्रकाराची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने