उद्धव ठाकरेंचा स्वभाव, कार्यपद्धतीमुळे मुख्यमंत्रीपदावर गदा?

ब्युरो टीम:  महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे शिवसेना अडचणीत आली आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाळीने सेनेचा बालेकिल्ला पडल्याचं स्पष्ट झालंय. बाहेरच्या शत्रूपेक्षा अंतर्गत कलह किल्ला फोडतात आणि बुरुजही पोखरतात याची जाणीव शिवसेना प्रमुखांना झालीच असेल. १९९५ नंतर शिवसेना पहिल्यांदा सत्तेत आली. पण सत्ता टिकवण्यात कस लागला. कोरोना आणि लॉकडाऊनमधून तोल सांभाळत सत्ताधारी वाटचाल करत असतानाच आयकर विभाग, ईडीच्या धाडींचे वार सहन करत ठाकरे सरकार तरलं होतं. मात्र, राज्यसभेच्या निवडणुका लागल्या आणि साडेसातीने डोकं वर काढलं. (Uddhav Thackeray Government Latest News)राज्यसभेच्या निवडणुकीवरून भाजपसोबतची डिल फिस्कटली. त्यातच सेनेच्या संजय पवारांना शह देण्यात फडणवीसांना यश आलं. धनंजय महाडिक दिल्लीत पोहोचले. यावेळीच सत्ताधारी आणि भाजपातील वाद आणखी शिगेला गेला. विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीने मोठी रणनिती आखली. हॉटेल मॅनेजमेंटवर जोर दिला. पण २१ मतं फुटली. मताधिक्य नसतानाही फडणवीसांनी आकड्यांचं समीकरण जुळवलं. आणि निकाल लागताच एकनाथ शिंदेंनी ३५ आमदारांसह सूरतला मार्गक्रमण केलं. सरकारमधील मंत्री बच्चू कडू आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही शिंदेंना सरद पुरवली. (Maharashtra Government Political Crisis)भाजपविरोधातील लढ्यात शिवसेनेला अतंर्गत कलहामुळे पळता भुई थोडी झाली आहे. पण उद्धव ठाकरे आणि पर्यायाने शिवसेनेच्या अंगलट येण्याची ही पहिली वेळ नाही. उद्धव ठाकरेंच्या स्वभाव आणि त्यांच्या वागण्यामुळेच ही वेळ आल्याची चर्चा आहे
स्वभाव आणि 'कॉलिंग कल्चर' नडलंउद्धव ठाकरे मुख्यमंत्री असून मंत्री आणि नेत्यांसाठी उपलब्ध नसतात अशी तक्रार सर्वजण करत असतात. अशोक चव्हाण तसेच काँग्रेसचे अन्य मंत्र्यांनीही ऐन मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल संताप व्यक्त केला होता. दोन आठवड्यापूर्वी निवडणुकीसाठी मुंबई दाखल होत असताना राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते तसेच अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनीही ठाकरे त्यांचे फोन उचलत नसल्याचं सांगितलं. विकासकामांसाठी आवश्यक निधी, मतदारसंघातील कामं यांसाठी मुख्यमंत्री वेळ देत नव्हते.उद्धव ठाकरे यांच्या कॉलिंग कल्चरबद्दलही सर्व नेत्यांमध्ये नाराजी असते. उद्धव ठाकरे वेळेत फोन उचलत नाहीत. मंत्रिमंडळात पदाधिकारी आणि अन्य मतदारसंघातून आलेल्यांची बैठका घेत नाहीत. त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं, असा प्रश्न आमदार विचारतात. मुख्यमंत्री अडीच वर्षात घरातूनच कारभार सांभाळत असतात. बैठकांनाही उपस्थिती नसते, अशी चर्चा मंत्री मंडळात आहे.
मुख्यमंत्र्यांचं आजारपण आणि आदित्य ठाकरेंची एन्ट्री मविआ सरकार स्थापन होत असताना शिवसेनेच्या गोटात किती मंत्रीपदं येणार याकडे सर्वांचं लक्ष्य होतं. मात्र मलईदार खाती राष्ट्रवादीने लाटली. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना खाती मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, आदित्य ठाकरेंचं राजकीय स्थान पक्क करण्यासाठी कोणताही प्रशासकीय अनुभव नसताना त्यांच्याकडे मंत्रिपद देण्यात आलं. उद्धव ठाकरेंच्या आजारपणात आदित्य ठाकरेंच्या हातात सर्व सूत्र होती. यावेळी एकनाथ शिंदेंसह अन्य मोठ्या नेत्यांनाही आदित्य ठाकरेंचे उंबरे झिजवायला लागत होते. कामांसाठी वेळ मागावी लागत असे. यातून शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांमध्ये नाराजी वाढली.दरबारी नेत्यांमुळे खरे कार्यकर्ते बॅकफूटवरशिवसेनेत दरबारी राजकारण करणाऱ्यांची संख्या वाढल्याचा आरोप होतोय. यामध्ये संजय राऊत परिवहन मंत्री अनिल परब आणि अनिल देसाई यांचा समावेश आहे. संजय राऊत यांच्या टोकाच्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीतील अन्य नेतेही नाराज होते. राऊत हे लोकमान्य नेते नाहीत, असा अंतर्गत सूर वाजत राहिला संजय राऊत यांना स्वत:चा मतदारसंघ नाही. मात्र ते चौथ्यांदा राज्यसभेवर जात आहेत. सत्ता आल्यानंतर अनिल परब अचानक ठाकरेंच्या जवळच्या नेत्यांमध्ये आले. यामुळे रामदास कदम यांच्यासारख्या शिवसैनिकानेही उघड उघड नाराजी व्यक्त केली होती.आदित्य ठाकरे आणि शिवसैनिकांची पुढची पिढी मारक ठरली आदित्य ठाकरेंच्या हातात अनेक गोष्टींची सूत्र आल्यानंतर वरिष्ठ नेत्यांना सापत्न वागणूक मिळाली. पक्षासाठी आयुष्य खर्च करूनही आदित्य ठाकरेंनी सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही. यामुळे वरिष्ठ नेत्यांमध्ये राग धुमसत राहिला. यातच वरुण सरदेसाई यांचीही पक्षांतर्गत निर्णयांमध्ये वाढत असलेला हस्तक्षेप वरिष्ठ नेत्यांच्या पचनी पडत नव्हता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने