'या' बँकेच्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी

नगर : नगर अर्बन बँके मधील खात्यांमधील  रक्कम व ठेवी पुन्हा मिळण्यासाठी बऱ्याच दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या अर्बन बँकेच्या खातेदारांना दिलासा मिळणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन द्वारे मिळणाऱ्या दुसऱ्या टप्प्याला नुकतीच परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या दि.15 जून दरम्यान अर्बन बँकेच्या खातेदारांना आपल्या खात्यातील  रक्कम परत मिळणार आहेत, अशी माहिती अर्बन बँकेचे चेअरमन राजेंद्र अग्रवाल यांनी दिली.
डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नियमानुसार मार्च महिन्यात पहिल्या टप्यात खातेदारांना रक्कमा परत करण्यात आल्यानंतर बँकेने वारंवार भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा केल्यानंतर डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनचा दुसरा टप्पा मंजूर झाला आहे. यावेळी अर्बन बँकेतील ७८१३ खात्यांमधील सुमारे १२० कोटीपर्यंतच्या रक्कमा परत मिळण्यास सुरवात होत आहे, अशी माहिती बँकेच्या व्हाईस चेअरमन दीप्ती गांधी यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने