२१ जून...‘वर्षा’तला शेवटचा दिवस?



ब्युरो टीम : महाविकास आघाडीला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून खोचक टोला लगावला आहे. “२१ जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस?” अशा शब्दांत मनसेनं थेट उद्धव ठाकरेंवरच खोचक टोला लगावला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या रुपाने उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर आपल्याच मंत्र्याकडून मोठं संकट ओढवलेलं असताना दुसरीकडे यानिमित्ताने विरोधकांच्या हाती मात्र आयतंच कोलीत मिळाल्याचं दिसून येत आहे.
काल, सोमवारी रात्रीपासूनच शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नॉट रीचेबल असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे. भाजपासोबत सरकार स्थापन करावं, अशी अट एकनाथ शिंदेंनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना घातल्यामुळे त्यावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यासंदर्भात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना सूरतला एकनाथ शिंदेंशी चर्चा करण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. त्यात आता भाजपासोबतच मनसेकडून देखील शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने