राणा बाईला शिवसेना नावाचा रोग झाला आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याची घाई झाली आहे. बाई थोडी कळ काढा हि शिवसेनेची शाळा आहे, सुट्टीवर गेलेली पोर परत येतील आल्यानंतर पहिले तुमचा अमरावतीतून सुफडा साफ करतील. बोगस कागदपत्रे..." असं ट्वीट दिपाली सय्य्द यांनी केलं आहे.
"सुरक्षा महाराष्ट्रातच सोडून ढुंगणाला पाय लावून पळालेल्यांना आम्ही संरक्षण देणार नाही. आमदारांना संरक्षण असतं, त्यांच्या कुटुंबियांना नसतं." असं शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले होते त्यानंतर राणा यांनी त्यांच्यावर टीका केली होती. "संजय राऊत हे जबाबदार व्यक्ती असताना म्हणतायत की आमदारांना संरक्षण आहे, त्यांच्या कुटुंबियांना नाही. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे संजय राऊतजी? की आपण त्यांच्या परिवारांना मारताय, जो परत नाही आला त्यांच्या परिवाराला मारण्याची सरळसरळ धमकी तुम्ही देताय" अशी टीका राणा यांनी केली होती. त्यानंतर दिपाली सय्यद यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय.
सध्या महाविकास आघाडी सरकार धोक्यात असून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाचे ४० पेक्षा जास्त आमदार घेऊन बंड पुकारले आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकापासून राज्यात राजकीय नाट्य चालू आहे. तर ही शिवसेनेची खेळी आहे असा दावा दिपाली सय्यद यांनी केला आहे. बंड केलेले आमदार परत आल्यावर तुमचा अमरावतीतून सुफडा साफ होईल अशी टीका त्यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा