रात्रीस खेळ चाले! २०१७ ची होणार का पुनरावृत्ती?


ब्युरो टीम : राज्यसभा निवडणुकीची  मतमोजणी थांबली  आहे. मतदान पूर्ण होऊन तीन तास उलटले तरीही अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. महाविकास आघाडीच्या तीन आमदारांचं मतदान रद्द करण्याची मागणी भाजपनं केली आहे. भाजपनं थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यामुळे मतमोजणी रखडली आहे. त्यामुळे या निवडणुकीचा  निकाल रात्री उशिरा  हाती येण्याची चिन्हे आहेत.
आज  घडतं असलेल्या या प्रकाराणे मात्र २०१७ मध्ये गुजरातमध्ये राज्यसभेची निवडणुकीची  पुन्हा एकदा राजकीय वर्तुळ मध्ये चर्चा सुरु झाली आहे . त्यावेळीही असंच नाट्य रंगलं होतं. तीन जागांसाठी चार जण रिंगणात आहेत. सत्ताधारी भाजपचं संख्याबळ पाहता त्यांचे दोन उमेदवार विजयी होणं नक्की होतं. मात्र निवडणुकीआधी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी राजीनामे दिले. त्यामुळे भाजपचे अमित शहांनी तिसरा उमेदवार रिंगणात उतरवला. शहांच्या खेळीमुळे काँग्रेसचे चाणक्य मानल्या जाणाऱ्या अहमद पटेल यांची जागा धोक्यात आली.
विजयासाठी ४५ मतं गरजेची होती. काँग्रेसच्या २ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं. त्यामुळे या आमदारांचं निलंबन करण्याची मागणी काँग्रेसनं केली. काँग्रेसच्या २ आमदारांनी भाजपला मतदान करत बॅलेट पेपर दाखवल्याचा आरोप होता. काँग्रेसनं आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. त्यामुळे निवडणूक आयोगानं मतमोजणी रोखली. काँग्रेसची मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली. दोन आमदारांची मतं अवैध ठरली. याचा फायदा अहमद पटेल यांना झाला. अवघ्या अर्ध्या मतानं त्यांनी ही निवडणूक जिंकली. पटेल यांचा पराभव करण्यासाठी शहांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. मध्यरात्रीपर्यंत राजकीय घडामोडी सुरू होत्या. अखेर पटेल यांनी बाजी मारली.
आज  राज्यसभा निवडणूक मतमोजणी थांबल्यावर 2017 च्या निवडणुकीची  पुन्हा राजकीय वर्तुळत चर्चा  सुरु झाली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने