रामदास आठवले म्हणतात, एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त दणका दिला


ब्युरो टीम : ‘एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही,’ असं ट्विट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंड पुकारण्याच्या तयारीत असल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदारांसह संपर्काबाहेर असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे १५ ते ३५ आमदारांसहित सूरतमधील हॉटेलमध्ये थांबले असून त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षाकडून पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. यादरम्यान सर्वपक्षीय नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया उमटत आठवले यांनीही यावर भाष्य केलं आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही,’ असं आठवले यांनी म्हंटले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने