कोण होणार नवीन राष्ट्रपती?


ब्युरो टीम : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. १८ जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होईल. २१ जुलैला देशाला नवे राष्ट्रपती मिळतील. २९ जूनपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येतील.
या निवडणुकीत मतदानासाठी विशेष शाई असलेलं पेन देण्यात येईल. मतदान करताना लोकप्रतिनिधींना १,२,३ असा पसंतीक्रम ठरवता येईल. पहिली पसंती न सांगितल्यास मत रद्द ठरवलं जाईल.

या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना व्हिप जारी करता येणार नाही. संसद आणि विधानसभेत मतदान होईल. राज्यसभेचे महासचिव निवडणूक प्रभारी असतील. कोरोना प्रोटोकॉल पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै २०२२ रोजी संपणार आहे. गेल्या वेळी राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक १७ जुलै २०१७ रोजी झाली होती.

असा आहे  निवडणूक कार्यक्रम


नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत- २९ जून


नामांकन अर्जांची छाननी- ३० जून


नामांकन परत घेण्याची तारीख- २ जुलै


मतदान- १८ जुलै


मतमोजणी- २१ जुलै

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने