ब्युरो टीम : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना फेसबुक लाईव्हमध्ये अतिशय भावनिक पण तितकचं कणखर भाषण केलं. राज्यातील बहुतांश जनता त्यांच्या या भाषणाचे कौतुक करत आहे. पण त्याचवेळी त्यांचे बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
"एखादा माणूस ज्यादिवशी आपल्या नशीबालाच कर्तृत्व समजू लागतो त्यादिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो", असं राज ठाकरे यांनी ट्विट करीत म्हटलंय. राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये कुठेही उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलेलं नाहीये. पण अप्रत्यक्षरित्या त्यांनी मावळत्या मुख्यमंत्र्यांवर टीकेला बाण सोडलाय.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया काय असणार? ते काय बोलणार? ज्यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला, त्यांच्यावर कोणत्या शब्दात टीका करणार?, याकडे महाराष्ट्राचं लक्ष होतं. पण उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर १५ तासांनी ट्विट करत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्तृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय
टिप्पणी पोस्ट करा