मुंबई पोलीस आयुक्तपदी विवेक फणसाळकर


ब्युरो टीम : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांच्या बंडामुळं अडचणीत सापडलंय. त्यातच आता सत्तासंघर्षाच्या खेळादरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी आली आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलीस आयुक्तपदी  विवेक फणसाळकर यांची नियुक्ती केली. 
मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे  हे उद्या निवृत्त होत आहे. त्यांची जागा विवेक फणसाळकर घेणार आहेत. याआधी ते ठाण्याचे पोलीस आयुक्त होते. 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी, फणसाळकर मुंबई सीपी म्हणून नियुक्तीपूर्वी पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे डीजी आणि एमडी म्हणून काम करत होते. 2018 मध्ये, विवेक फणसळकर यांची परमबीर सिंग यांच्यानंतर ठाणे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने