विधानपरिषदेसाठी भाजपने कोणाला दिली संधी ? वाचा


मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या तिघांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवार देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या १० पैकी भाजपकडे चार जागांवर निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी मते आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसकडे एका जागेवर निवडून येण्यासाठी लागणारी मते आहेत. त्यामुळे दहाव्या जागेवरील लढत चुरशीची होणार आहे.
रोहित पवारांना शह देण्याच्या हेतूने कर्जत-जामखेडमध्ये विधानसभेला पराभूत झालेल्या राम शिंदे यांना विधानपरिषदेवर घेण्यात येत असल्याची चर्चा आहे. शिंदे हे मागील युती सरकारच्या काळात मंत्री होती. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मात्र, रोहित पवार यांनी त्यांचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता. सध्या शिंदे हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून देखील काम करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने