‘मविआ’ हटेगा, कमल खिलेगा! बैठक सुरू



ब्युरो टीम : शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराज आमदारांसह पक्षाविरोधात केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. त्यातच आता भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी भाजप नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत असलेल्या बैठकीला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री आणि आमदार गिरीज महाजन यांच्यासह पक्षाचे इतर प्रमुख नेते उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सरकार कोसळल्यास सत्तास्थापनेसाठी नेमकी कशी रणनीती आखायची, याबाबत भाजप नेत्यांच्या बैठकीत खलबतं होत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ५५ पैकी ४० पेक्षा अधिक आमदारांना स्वत:कडे खेचण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे शिंदे हे लवकरच आपला स्वतंत्र गट स्थापन करून भाजपला समर्थन देतील अशी चिन्हे आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने