'मला जबरदस्तीने इंजेक्शन टोचलं'; देशमुखांच्या या गंभीर आरोपानंतर शिंदे म्हणाले...


ब्युरो टीम : एकनाथ शिंदे यांनी नितीन देशमुख यांच्या आरोपांविषयी विचारण्यात करण्यात आली. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी हा आरोप फेटाळून लावला. मी नितीन देशमुख यांनी जबरदस्तीने घेऊन गेलो असतो तर आमची दोन लोकं त्यांना सोडायला गेली असती का, असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता दर तासाला वेगवेगळे वळण लागताना दिसत आहे. एकीकडे शिवसेनेतील आमदार गुवाहाटीत जाऊन एकनाथ शिंदे यांना सामील होत आहेत. मात्र, त्याचवेळी पहिल्या दिवसपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे माघारी परतले आहेत. त्यांनी माघारी परतल्यानंतर एकनाथ शिंदे  यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला फसवून सूरतच्या हॉटेलमध्ये नेण्यात आले होते. त्याठिकाणी माझा घात करण्याचा डाव होता, असा आरोप नितीन देशमुख यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने