एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी काय कमी केलं? उद्धव ठाकरे यांचा सवाल



ब्युरो टीम : 'एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी काय कमी केलं? नगर विकास खातं दिलं. माझ्याकडची दोन खाती दिली" असा सवाल विचारतानाच  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ' सत्ता आल्यानंतर आधी कोव्हिडचं विचित्र लचांड गेल्या दोन वर्षांपासून मागे लागलं आहे. कोव्हिड संपतो तर मानेचा त्रास सुरु झाला आणि आता हा त्रास. कोण कोणत्या वेळी कसं वागेल हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मी त्या दिवशी मनातलं सगळं सांगितलं, आजही मन मोकळं करतो. माझ्या मानेवर शस्त्रक्रिया गरजेची होती. मोदीही म्हणाले होते, ऑपरेशन हे हिंमतीचं काम आहे, पण हिंमत माझ्या रक्तातच आहे. पहिल्या ऑपरेशनच्या वेळी सगळं ठीक होतं, मग शरीराला त्रास होऊ लागला. शरीराचे काही भाग बंद पडत होते, म्हणून दुसरं ऑपरेशन केलं. त्याचा फायदा घेत विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला.
उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांचा रौद्रावतार दिसून आला. त्यांनी म्हटले की, सेनेच्या अस्तित्वावर बोलणाऱ्यांना निष्ठा काय असते दाखवावी लागेल. मला या सगळ्या गोष्टीचा वीट आला आहे. पण ही वीट आता मी डोक्यात हाणणार आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने