निकाल आला, उद्या महाराष्ट्रात बहुमत चाचणी

ब्युरो टीम : राज्यपालांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाला शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होत. सुप्रीम कोर्टाने यावर निकाल दिला असून राज्यपालांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाला कुठलीही स्थगिती दिली नाही. त्यामुळे आता बहुमत चाचणी उद्या होणार हे स्पष्ट झालय.
सुप्रीम कोर्टात सायंकाळी पाच पासून युक्तिवाद सुरु होता. हा युक्तीवाद रात्री साडेआठ वाजता पूर्ण झाला आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आता रात्री नऊ वाजता यावर निकाल आला. या निकालाकडे फक्त महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. 
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांच्या बंडामुळं अडचणीत सापडलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीला ३० जून रोजी सामोरं जाण्याचे आदेश दिले आहेत. बंडखोर आमदार उद्या गोव्यातून मुंबईत येणार आहेत. मुंबई विमानतळावरुन बंडखोर आमदार विधानभवनात सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी केंद्र सरकारनं मोठी पावलं उचलली आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २ हजार जवान मुंबईत दाखल झाले आहेत. तीन विशेष विमानांद्वारे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान मुंबईत पोहोचले आहेत. तर, दुसरीकडे राज्यपालांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाला शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. सुप्रीम कोर्टात सायंकाळी पाच पासून युक्तिवाद सुरु होता. शिवसेनेच्यावतीनं अभिषेक मनू सिंघवी, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून कौल यांनी तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावतीनं तुषार मेहता यांच्याकडून युक्तिवाद केला.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने