थोड्याच वेळात एकनाथ शिंदे गटाची बैठक


ब्युरो टीम :  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची आज गुवाहाटीमध्ये आमदारांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत सरकार स्थापनेबाततच्या पुढील रणनिती आखण्यात येतील, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली आहे. तसेच सध्या आम्हाला ५० आमदारांचा पाठिंबा असून त्यात ४० पेक्षा अधिक आमदार शिवसेनेचे आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फळी निर्माण झाली आहे. ४० पेक्षा जास्त शिवसेना आमदारांचा पाठिंबा महाविकास आघाडी धोक्यात आली आहे. त्यातच आता थोड्याच वेळात शिंदे गटाची बैठक होणार  असून त्यामध्ये पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना एकनाथ शिंदे यांनीच माहिती दिली आहे. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे देखील गुवाहाटीला पोहोचले असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, अद्याप भास्कर जाधव यांच्याशी संपर्क झाला नसल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. आज आमची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल. राज्यपालांना पत्र द्यायचं की नाही, याचा निर्णयही या बैठकीत घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने