ब्युरो टीम : शिवसेनेचे विधिमंडळ मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असं नि:क्षून सांगत शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
बंडखोर आमदारांची मनधरणी करुनही आमदार परत येत नसल्याने बंडखोरांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. अशावेळी गुवाहाटीमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अॅक्शनला रिअॅक्शन दिली आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले असतानाच शिवसेनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. बंडखोर आमदारांची मनधरणी करुनही आमदार परत येत नसल्याने बंडखोरांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. मुंबईतील वर्षा बंगल्यावर बुधवारी संध्याकाळी ५ वाजता शिवसेनेची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी उपस्थित राहावे. अन्यथा त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर एकनाथ शिंदे देखील अॅक्शनमोडमध्ये आहे आहेत.
टिप्पणी पोस्ट करा