केरळमधील वायनाडमध्ये काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. भारतीय युवक काँग्रेसने एका ट्विटमध्ये काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप केला आहे.
ब्युरो टीम : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडी कडून चौकशी केली जात आहे. तर याविरोधात देशात अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या कारवाईचा निषेध करत आहेत. याचदरम्यान खासदार राहूल गांधी याच्या मतदार संघात म्हणजेच वायनाडमधून (Wayanad) एक धक्कादायक प्रकार अघडकीस आला असून त्यांच्याच कार्यालायावर काही जणांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. तर त्यांनी राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचंही उघड झालं आहे. या तोडफोडी मागे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पक्षाने सांगितले की, हातात झेंडे घेऊन एसएफआयचे कार्यकर्ते कार्यालयाच्या खिडक्यांवर चढले आणि त्यांची तोडफोड केली.
टिप्पणी पोस्ट करा