ब्युरो टीम :विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल असलेल्या शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेते पदावरुन हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी आमदार अजय चौधरी यांच्याजवळी ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यातच शिंदे यांनी ट्विट करीत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये आहेत. त्यांच्यासोबत काही समर्थक आमदार असल्याने महाविकासआघाडी सरकार धोक्यात असल्याच्या चर्चांनाही उधाण आलंय. अशातच एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे.
“आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा