ब्युरो टीम : शिवसेना नेते एकनाथ शिंदे संपर्काबाहेर असल्याने राज्यात राजकीय भूकंप आला आहे. विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला असताना एकनाथ शिंदेशी संपर्क होत नसल्याने त्यांनी बंड पुकारल्याची शक्यता व्यक्त होती आहे. दरम्यान एकनाथ शिंदे सूरतमध्ये असून त्यांच्यासोबत जवळपास २५ आमदार उपस्थित असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमकं कोणकोणते आमदार आहेत, याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तुम्हालाही याची उत्सुकता लागली असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदेंसोबत १३ ते २५ आमदारही शिवसेनेच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहेत. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व शिवसेना आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक बोलावली आहे.
कोणकोणते आमदार एकनाथ शिंदे सोबत आहेत?
संजय राठोड
अपक्ष आमदार जयस्वाल (रामटेक)
तानाजी सावंत
ज्ञानराज चौघुले
यवतमाळचे पालकमंत्री भुमरे
शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण)
विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम)
बालाजी किणीकर (अंबरनाथ)
भरत गोगावले (महाड)
महेंद्र दळवी (अलिबाग)
महेंद्र थोरवे (कर्जत)
कृषिमंत्री दादा भुसे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचेही फोन बंद आहेत.
टिप्पणी पोस्ट करा