भाजपकडून कोणती आणि किती मंत्रिपदं मिळणार?'; एकनाथ शिंदे म्हणाले



ब्युरो टीम :उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर तब्बल १३ तासांनी एकनाथ शिंदेंनी यावर पहिली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून दिली. ‘वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस,’ असं ट्विट शिंदेंनी सकाळी पावणे अकरा वाजता केलं.
त्यानंतर पुढच्याच मिनिटाला त्यांनी, “भाजपासोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका,” असंही आवाहन आपल्या समर्थकांना केलं आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहीत ३९ शिवसेना आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे बुधवारी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. याचबरोबर पावणे तीन वर्षांपासून सत्तेत असणारं आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया देताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करतानाच भाजपासोबत मंत्रीपदांबाबत चर्चा झालेली नसल्याचं स्पष्ट केलंय.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने