भारताने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत मात करत मालिकेतील आव्हान ठेवले कायम

ब्युरो टीम : भारताने तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने दमदार फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी १८० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला भारताने एकामागून एक धक्के दिले आणि ४८ धावांनी विजय साकारला. या मैदानात आतापर्यंत प्रथम फलंदाजी करताना कोणत्याही संघाला विजय मिळवता आला नव्हता. पण भारताने ही गोष्ट मोडून काढली आणि इतिहास रचला.
दरम्यान, या विजयासह भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे.
आजच्या सामन्यात भारताने टॉस गमावला, तरी  दोन्ही सलामीवीरांनी धडाकेबाज सुरुवात करून दिली. ऋतुराजने पाचव्या षटकात तब्बल पाच चौकार लगावले आणि २० धावांची लूट केली. पहिल्या पॉवर प्लेमध्ये भारताने धडाकेबाज फटकेबाजी करत एकही विकेट गमावली नाही. भारताने पहिल्या पॉवर प्लेमध्ये यावेळी बिनबाद ५७ अशी मजल मारली. तर, भारतीय  संघाने  २० षटकात १७९ धावांपर्यंत मजल मारली.
भारताच्या १८० धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीपासूनच धक्के द्यायवा सुरुवात केली. भारताच्या युजवेंद्र चहलने यावेळी २० धावांत तीन बळी मिळवत भाारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. चहलला यावेळी हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांच्याकडून सुयोग्य साथ मिळाली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने