'या' शहरात मुस्लिम युवकांनी जाळला नुपूर शर्माचा पुतळा



अहमदनगर : इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधान करणार्‍या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा हिचा पुतळा शहरातील कोठला चौकात दहण करण्यात आला. शर्मा हिने मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद देशासह जगभर उमटत असताना शहरात बुधवारी नगरमध्ये आंदोलन करण्यात आले.
मुस्लिम समाजाच्या युवकांनी एकत्र मोर्चाने येऊन नुपूर शर्मा हिच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चपलांचा हार घालून जोडे मारले. साहेबान जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अब्दुल रऊफ खोकर, मुजाहिद शेख, शहानवाझ शेख, रेहान कुरेशी, सुफियान शेख, तन्वीर शेख, खालिद शेख, समीर खान, नवेद शेख आदींसह मुस्लिम युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करुन शर्मा हिच्या अटकेची मागणी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणार्‍या प्रमुख पदाधिकार्‍यांना अटक केली. इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण जगाला प्रेम, शांतता व बंधुत्वाची शिकवण दिली आहे. त्यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करून नुपूर शर्माने संपूर्ण देशातील मुस्लिम समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. कोणताही मुस्लिम व्यक्ती पैगंबरांबद्दल चुकीचे व बेताल वक्तव्य खपवून घेणार नाही. जातीवादी व धर्मांध शक्तींशी जोडलेल्या नुपुर शर्मा कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने