माझ्या दंडावर बळजबरी इंजेक्शन टोचले!, नितिन देशमुखांचा गौप्यस्फोट


ब्युरो टीम : ‘माझा रक्तदाब वाढला नव्हता. पण मला हार्टअॅटक आल्याचा बनाव रचण्यात आला. मला रुग्णालयात नेल्यानंतर २०-२५ जणांना मला पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचले. ते इंजेक्शन काय होतं माहिती नाही. माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचे षडयंत्र रचले होते;’ असा खळबळजनक गौप्यस्फोट  आज अकोल्याच्या बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केला.
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आमदारांना कश्या पद्धतीने नेलं, याची माहिती आता हळूहळू समोर येतीय. काल उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी आपली सुटका कशा पद्धतीने झाली, याचा थरारक प्रसंग मुख्यमंत्र्यांसमोर कथन केला. आज अकोल्याच्या बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी तर गौप्यस्फोट केलाय. मला हार्टअॅटक आल्याचा बनाव रचण्यात आला. मला रुग्णालयात नेल्यानंतर २०-२५ जणांना मला पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचले गेले, असं नितीन देशमुख यांनी सांगितलं. ‘मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मी मंत्र्यांसोबत गेलो होतो पण मी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आता मी माझ्या घरी जात आहे. मी रात्री १२ वाजता हॉटेलमधून निघालो. रस्त्यावर तीन वाजता उभा होता. पण माझ्यापाठी २०० पोलीस होते. कोणतेही वाहन मला लिफ्ट देत नव्हते. त्यानंतर पोलीस मला रुग्णालयात घेऊन गेले आणि मला हार्टअॅटक असल्याचा बनाव रचला,’ असेही देशमुख म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने