संजय राऊत यांच्या ट्विटला राणे यांचे रिटर्न गिफ्ट


ब्युरो टीम : एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षातील आमदारांनी बंड पुकारल्यामुळे उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. यामुळे संजय राऊत यां नी ट्विटरला एक फोटो शेअर केला होता. या फोटोतून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीवर वार केल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला होता. ‘नेमके हेच घडले’ असं कॅप्शन देत त्यांनी फोटो शेअर केला होता. संजय राऊतांच्या या ट्विटवर नितेश राणे यांनी मीम शेअर करत उत्तर दिलं.

नितेश राणे यांनी केलेल्या ट्विट मध्ये २०१९ मध्ये शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीवर वार केला आणि २०२२ मध्ये शिदेंनी उद्धव ठाकरेंच्या असं दाखवण्यात आला आहे. यावेळी दोघांच्याही पाठीवर धनुष्यबाण दाखवण्यात आला. सोबतच हे कर्माचं फळ आहे असंही लिहिण्यात आलं आहे. नितेश राणे यांनी हे मीम शेअर करताना ‘रिटर्न गिफ्ट’ असा टोलाही लगावला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून भाजपाने सत्तास्थापनेचा दावा करण्याची तयारी सुरु केली आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा देताच मुंबईत भाजपाच्या कार्यालयाबाहेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि भाजपा नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने