एलआयसी शेअर गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढवतोय!

मुंबई : आज मुंबई शेअर बाजारात 'एलआयसी'चा शेअर १.१५ टक्क्यांनी घसरला. तो ७२९.५० रुपयांपर्यंत खाली आला आहे. इन्ट्रा डे मध्ये त्याने ७२३.७० रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. बुधवारच्या सत्रात एलआयसीचा शेअर २ टक्क्यांनी घसरला होता. त्यामुळे आता एलआयसी ने गुंतवणूकदारांचे टेन्शन अजूनच वाढवले आहे. एलआयसी चा शेअर केव्हा वाढेल, या एकाच गोष्टीकडे गुंतवणूकदारांचे डोळे लागले आहेत. 
एलआयसीचा शेअर आज नाही तर उद्या वाढेल, या आशेवर बसून राहिलेल्या गुंतवणूकदारांची आता अवस्था आणखी बिकट झाली आहे. ९ जून रोजी एलआयसीच्या शेअरने ७२३.७० रुपयांचा नवा नीचांकी स्तर गाठला. त्यामुळे गुंतवणूकदारांची टेन्शन वाढतच चालले आहे. एलआयसीचा आयपीओ येऊन अजून  एक महिन पू्र्ण झालेला नाही. तोवरच गुंतवणूकदारांना या समभाग विक्री योजनेतून एक लाख कोटींहून अधिक रुपयांचं नुकसान सोसावं लागल आहे. सलग नवव्या दिवशी एलआयसीच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकंदरीत एखाद्या कंपनीचा आयपीओ केव्हा येईल, याची वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांचा एलआयसीच्या आयपीओमुळे चांगलाच भ्रमनिरास झाला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने