चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीच, आरबीआयचे स्पष्टीकरण
मुंबई : माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आणि रवींद्रनाथ टागोर यांचे फोटो चलनी नोटांवर छपाई केले जाणार या वृत्ताचं रिझर्व्ह बँकेनं खंडन केले आहे. चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्या ऐवजी कोणत्याही इतर महापुरुषांचे फोटो छपाई करण्याचा कोणताही प्रस्ताव बँकेच्या विचाराधीन नाही, असे रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
कालपासून विविध माध्यमांमध्ये लवकरच चलनी नोटांवर माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आणि रवींद्रनाथ टागोर यांचे फोटो छपाई केले जाणार, अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. सध्या चलनी नोटांवर महात्मा गांधी यांची फोटो आहे. त्याऐवजी लवकरच चलनात नवीन नोटा येतील त्यावर कलाम आणि टागोर यांचे फोटो असतील, असे वृत्त काही माध्यमांनी प्रकाशीत केलं होते. नवीन फोटोसह चलनी नोटांबाबत अर्थ मंत्रायल आणि रिझर्व्ह बँकेन या प्रस्तावाबाबत प्राथमिक चर्चा केली. तसेच काही चलनी नोटांवर राष्ट्रपती अब्दुल कलाम आणि रवींद्रनाथ टागोर यांचे वॉटरमार्क वापरण्याचा विचार करत असल्याचे या वृत्तात म्हटले होते. मात्र असा कोणताही विचार नाही, असे रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेने या प्रकरणी एक निवेदन जारी केले आहे. ज्यात चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्याव्यक्तिरिक्त कोणत्याही इतर महापुरुषांचे फोटो छपाई करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे बँकेनं म्हटलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा