Of course आम्ही गुलाल उधळणार' : ठाकरे

ब्युरो टीम : राज्यसभेसाठीच्या ६ जागांसाठी होत असलेलं मतदान पूर्ण झालेलं आहे. विधानसभेच्या २८५ सदस्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे.
आमदारांवरील नजरकैद, मतगणितांच्या बेरजा-वजाबाक्या, आरोप-प्रत्यारोपांची राळ आणि विजयाच्या दाव्या-प्रतिदाव्यांनंतर ही राज्यसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीवर महाविकास आघाडीचा वरचष्मा असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसत आहे. अर्थात गणिती आकड्यांचे राजकीय अन्वयार्थ हे नेहमीच अपेक्षापेक्षा वेगळे असल्यामुळे संध्याकाळी हाती येणाऱ्या निकालांबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे.
दरम्यान, मतदान पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यसभेत महाविकास आघाडी ४ जागा जिंकणार का? गुलाल उधळणार का? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर 'Of course आम्ही गुलाल उधळणार', असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
सहा जागांपैकी पाच जागांचं चित्र स्पष्ट आहे. परंतु सहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत चांगलीच चुरस आहे. "सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक आणि संजय पवार यांच्यात सामना होत आहे. संजय राऊतांनंतर पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची आवश्यक मते संजय पवार यांना मिळाल्याने ते विजयी होतील", असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत. तर "मतदान संपलंय, जो काही चमत्कार होणार आहे ते निकालात दिसेल", असं सूचकपणे भाजप नेते सांगत आहेत.
तर, मतदान संपल्यानंतर ४ वाजताच्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या बाहेर आले. प्रसारमाध्यमांशी त्यांनी हलकासा संवाद साधला. राज्यसभेच्या चार जागा महाविकास आघाडी जागा जिंकणार का? महाविकास आघाडी गुलाल उधळणार का? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर Of course आम्ही गुलाल उधळणार', असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना खोदून खोदून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु संध्याकाळपर्यंत शासकीय निवासस्थानाहून परत विधिमंडळात येतो. मग तुमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं देतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने