मुंबई : महागाईला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आज पुन्हा एकदा रेपो दर वाढवला. एमपीसी बैठकीच्या निर्णयाची माहिती देताना, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, रेपो दरात ०.५० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. रेपो दर आता ४.९० टक्के झाला आहे. यापूर्वी ४ मे रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ केली होती. रेपो रेटमध्ये वाढ झाल्यामुळे गृहकर्ज, कार लोन, पर्सनल लोन यांचा ईएमआय वाढेल असे बोलले जाते. चला समजून घेऊया, जर तुम्ही तुमच्या २० वर्षांसाठी ३० लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल, तर आता तुमचा ईएमआय कितीने वाढेल
सध्याच्या वाढीनंतर रेपो दरात एकूण ०.९% वाढ झाली आहे. आरबीआयने केलेल्या दर वाढीमुळे बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या यांसारख्या कर्जदाते त्यांचे कर्ज दर त्याप्रमाणे वाढवतील, ज्याचा अर्थ असा आहे की तुमचे ईएमआय त्यानुसार वाढतील. तुमच्याकडे ३० लाख रुपये थकबाकी असलेले गृहकर्ज २० वर्षांच्या शिल्लक कालावधीसह ७% वार्षिक व्याजाने असल्यास तुमचा ईएमआय २३,२५९ रुपयांवरून २४,९०७ रुपयांपर्यंत १,६४८ रुपयांनी वाढेल. म्हणजेच प्रत्येक लाख रुपयांच्या कर्जासाठी, तुम्हाला ईएमआय साठी ५५ रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. त्याचप्रमाणे ७ वर्षांच्या कालावधीसाठी ८ लाख रुपयांच्या ऑटो लोनसाठी जर व्याज दर १०% वरून १०.९% पर्यंत वाढला तर ईएमआयमध्ये ३७५ रुपये १३,२८१ वरून १३,६५६ रुपये इतकी वाढ होईल. याशिवाय ५ वर्षांच्या कालावधीसह पाच लाख रुपयांच्या वैयक्तिक कर्जावर, जर व्याज दर १४% वरून १४.९% पर्यंत वाढला तर तुमचा ईएमआय ११,६३४ रुपयांवरून ११.८६९ रुपयांपर्यंत २३५ रुपयांनी वाढेल.
याशिवाय, केंद्रीय बँकेने बँकांना सर्व प्रकारची किरकोळ कर्जे आणि वैयक्तिक कर्जे देखील बाह्य बेंचमार्कशी जोडण्याचे निर्देश दिले होते. यासाठी बँकांना आरबीआय रेपो रेट, ३- किंवा ६-महिन्यांचा सरकारी ट्रेझरी बिल रेट किंवा फायनान्शियल बेंचमार्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एफबीआयएल) द्वारे प्रकाशित केलेला इतर बेंचमार्क बाजार व्याज दराचा पर्याय देण्यात आला होता.
टिप्पणी पोस्ट करा