मार्च 2023 पर्यंत पुणे-सातारा अंतर १ तासांनी कमी होणार.

पुणे-सातारा महामार्गावरील (एनएच-4) खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगदा हा प्रत्येकी 3 मार्गिका असलेला दुहेरी बोगदा आहे. सध्या त्याचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटर द्वारे दिली आहे.
           सातारा-पुणे दिशेला असलेला सध्याचा 'एस' वळणमार्ग लवकरच पूर्ण होईल त्यामुळे अपघात जोखमीत मोठी घट होईल. 6.43 किमी लांबीच्या प्रकल्पासाठी एकूण भांडवली खर्च अंदाजे 926 कोटी रुपये आहे आणि मार्च 2023 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे असे ते म्हणाले. त्यांनी पुढे असे नमूद केले कि आपला देश आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत सुविधांमधील अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत आहे यात संपर्क व्यवस्थेच्या माध्यमातून समृद्धी उलगडत असुन जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची गरज नवभारता आहे असे गडकरी म्हणाले.
          

या बोगद्यामुळे संपर्क व्यवस्थेत सुधारणा होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांना त्यांच्या वेळ आणि पैशात बचतीद्वारे थेट लाभ प्रदान करेल असे त्यांनी सांगितले. पुणे-सातारा आणि सातारा-पुणे हा खंबाटकी घाटमार्गे अनुक्रमे 45 मिनिटे आणि 10-15 मिनिटांचा प्रवास वेळ आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर, या प्रवासाचा सरासरी वेळ कमी होऊन 5-10 मिनिटांवर येईल असे गडकरी यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने