नवी मुंबईची रेल्वे सेवा पुन्हा ट्रॅकवर, 3 तासांनंतर अपघातग्रस्त लोकल कारशेडला रवाना

ब्युरो टीम:  ऐन सकाळी कार्यालयाला निघालेल्या नवी मुंबईकरांना आज लोकल विस्कळीत झाल्यामुळे मोठा फटका बसला.  सीएसएमटी रेल्वे स्थानकात लोकल रेल्वेचा डब्बा रुळावरून घसरला होता. त्यामुळे सीएसएमटी ते वाशी दरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली होती. अखेरीस 3 तासांच्या प्रयत्नानंतर रेल्वे सेवा पुर्वपदावर आली आहे.

ऐन पावसाळ्यातही सुरळीतपणे सुरू असलेली नवी मुंबईची हार्बर लोकल सेवा अचानकपणे ठप्प झाली. सीएसटीएम स्थानकामधून वाशीकडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला होता. रुळावरून लोकल घसरल्यानंतर बफरला जाऊन धडकल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे सीएसएमटी ते वाशी दरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली होती. फक्त वाशी ते पनवेल मार्गावर फक्त रेल्वे सेवा सुरू होती. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

सीएसएमटी रेल्वे स्थानकावर हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समलेले नाही. सध्या लोकल ट्रेन रुळावर आणण्यात आली आहे. 3 तासांच्या प्रयत्नानंतर सीएसएमटी वाहतूक सुरकळीत सुरू झाली आहे. सीएसएमटी स्थानकावर अपघात झाल्यामुळे एकाच प्लॅटफॉर्मवर वाहतूक बंद पडली होती, ती आता सुरू झाली आहे. या अपघातामुळे ऐन सकाळी कार्यालयाला निघालेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले आहे.  वाशीपर्यंत वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेक चाकरमानी हे लोकलमध्येच अडकले आहे. तर काही प्रवाशांनी चालत जाऊन जवळचे रेल्वे स्थानक गाठले आहे. चाकरमान्यांनी बस आणि इतर वाहनांनी कार्यालयं गाठली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने