ब्युरो टीम: 'प्लॅनेट मराठी' (Planet Marathi) हे मराठी वेबविश्वाला जागतिक पातळीवर नाव मिळवून देणाऱ्या हरहुन्नरी तरुण निर्माता अक्षय बर्दापूरकरचं एक स्वप्न आहे. सकाळ Unplugged या आमच्या कार्यक्रमात अक्षयनं मराठी सिनेविश्व, त्याच्या 'गोष्ट एका पैठणीची', 'जून' सिनेमांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार, प्लॅनेट मराठी राजकारणावर आधारीत कथानकांच्या सिरीजच एकामागोमाग का बनवतेय याविषयी मनमोकळा संवाद साधला आहे. यामध्ये अक्षय बर्दापूरकर यांनी, महाराष्ट्रात खऱ्याखुऱ्या राजकारणात जो ४० आमदारांचा गेम झाला तो 'मी पुन्हा येईन'मध्ये अगदी तंतोतंत आधीच कसा शूट केला गेला याविषयी एक खुलासा केला आहे. तो जर जाणून घ्यायचा असेल तर या बातमीत पॉडकास्टची लिंक जोडलेली आहे,तेव्हा निर्माते अक्षय बर्दापूरकर यांची मुलाखत नक्की ऐका.
याच मुलाखतीत अक्षय बर्दापूरकर यांनी त्यांच्या गोष्ट एका पैठणीची, जून या सिनेमांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांसंदर्भातला देखील एक किस्सा शेअर केला आहे. ते म्हणाले आहेत, 'आमच्या सिनेमांना जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाले तेव्हा दोन मिनिटं विश्वास बसला नाही कारण त्याआधी काही दिवसांपूर्वीच ....', आता अक्षय बर्दापूरकरांसोबत असं काय घडलं होतं पुरस्कार जाहीर होण्याआधी ज्यामुळे त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यावर विश्वास बसेना ते जाणून घेण्यासाठी ही पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका. तो देखील एक धमाल किस्सा आहे.
प्लॅनेट मराठीचे रानबाजार,त्यानंतर मी पुन्हा येईन,त्यानंतर आगामी राजीनामा हे सगळे एकापाठोपाठ एक येणारे सिनेमे राजकारणावर आधारित आहेत. हा राजकीय सिरीजचा सपाटा काय म्हणून प्लॅनेट मराठीनं लावला.तेव्हा बर्दापूरकरांनी दिलेलं उत्तर खोचक असलं तरी आताच्या राजकारणाला एकदम परफेक्ट सूट होत आहे. आता ते ऐकायला मात्र या बातमीत जोडलेली मुलाखतीची लिंक ओपन करुन आपल्याला नक्की ऐकावी लागेल. याच मुलाखतीत, मराठी सिनेमाकडे चांगला कॉन्टेंट आहे मग कुठे गणित अडतं, यावर देखील अक्षय बर्दापूरकर यांनी स्पष्ट मत मांडले आहे. तेव्हा प्लॅनेट मराठीचे मुख्य संचालक अक्षय बर्दापूरकर यांची ही पॉडकास्ट मुलाखत ऐकून राजकीय गुपितं समजून घेण्याची संधी मुळीच सोडू नका.
टिप्पणी पोस्ट करा