हा आमदार प्रसारमाध्यमांशी बोलत असतानाच आला विखे पाटलांचा फोन, पुढे काय झाले वाचा...

          ब्युरो टीम : महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेनंतर मतदार संघात येताच नांदगावचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी बुधवारी सायंकाळी सपत्नीक साई दरबारी हजेरी लावली. यावेळी मात्र प्रसार माध्यमांशी बोलतानाच त्यांना आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोन आला.
            शिर्डीत साई दर्शनानंतर सुहास कांदे प्रसार माध्यमांशी बोलत असतानाच भाजपचे शिर्डी विधानसभा मतदार संघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटलांचा त्यांना फोन आला. तुम्ही शिर्डीत आलात, मात्र मला फोन केला नाही, असे विखे पाटलांनी विचारले असता, साहेब तुम्ही मिनिस्टर झाल्यावर करू म्हटलं फोन, असे कांदे यांनी म्हटले. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने