धक्कादायक, महिला - पुरुषाची हत्या करुन नदीत फेकले

ब्युरो टीम : नागपूर शहरालगतच्या बुटीबोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका महिला आणि पुरुषाची हत्या करुन त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. यानंतर एकच खळबळ उडाली. या दोघांचेही हातपाय दोरीने बांधलेले अवस्थेत होते. रुई खैरी शिवार जवळील वेणानदी पात्रात या दोघांचे मृतदेह गुरुवारी आढळून आले. सुमारे 25 ते 30 वर्षे वयोगटातील हे दोघे असल्याचे सांगितले जात आहे. 
वेणा नदीजवळील पुलावरून जात असताना एका अज्ञात व्यक्तीला गुरुवारी सकाळी नदीपात्रात एका पुरुष आणि महिलाचा मृतदेह तरंगांना दिसला. त्याने लगेच याबाबत पोलिसांनी माहिती दिली.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी त्यांना दोरीने बांधलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगतानाचे हे दोन्ही मृतदेह आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी मदतनीसाच्या साहाय्याने ते दोन्ही मृतदेह बाहेर काढले. हे दोन्ही मयताना नायलॉन दोरीने बांधलेल्या अवस्थेत होते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. 
    

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने