भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका जिंकली,


ब्युरो टीम
:भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान सुरू असलेल्या ५० षटकांच्या तीन क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला त्रिनिदाद इथं झालेला दुसरा सामना भारतीय संघानं २ गडी राखून जिंकला आणि या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३१२ धावांचं आव्हान भारतीय संघासमोर ठेवलं होतं. अटीतटीच्या लढतीत भारतानं हे लक्ष्य ८ गडी गमावत ४९ षटकं आणि ४ चेंडूत पूर्ण केलं. अक्षर पटेलच्या नाबाद ६४ आणि श्रेयस अय्यरच्या ६३ धावांनी भारताला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडीजचा शाय होपनं दमदार ११५ धावांचं शतक आणि निकोलस पुरनच्या ७४ धावांच्या जोरावर ३११ धावसंख्या उभी केली होती.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने