पुरुषांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते केशर, जाणून घ्या फायदे



ब्युरो टीम : जगातील सर्वांत महाग मसाल्याचा पदार्थ  म्हणून केशर प्रसिद्ध आहे. त्याचे सेवन आरोग्यासाठी खूप चांगले आहे. बहुतेक लोक दुधात केशर मिसळून पितात. कुंकुम नावाने सुद्धा ते ओळखले जाते. लाल रंगाचे असणाऱ्या केशरचा रंग पाण्यात घातल्यावर पिवळा होतो. याची चव किंचित कडू आणि उग्र असते. याला एक प्रकारचा सुगंध असतो. हे कोरडे आणि उष्ण असते. केशर वात, कफ आणि पित्त यांचा नाश करणारे मानले जाते. जगभरात काश्मिरी केशर सर्वात उत्तम मानले जाते. याशिवाय इराण, बलाख-बुखारा या देशांमध्येही दर्जेदार केशरचे उत्पादन होते. केशरचा वापर फक्त जेवणाला चविष्ट बनवण्यासाठी केला जात नाही, तर त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळते. केशर सेवन केल्याने पुरुषांची शारीरिक दुर्बलता दूर होते. हे पुरुषांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया केशर सेवन केल्याने पुरुषांचे आरोग्य कसे चांगले राहते.

शारीरिक दुर्बलता दूर होण्यास मदत

पुरुषांनी  केशरचे नियमित सेवन केल्यास त्यांची शारीरिक दुर्बलता दूर होण्यास मदत होते. ते पुरुषांमधील मेल हार्मोनचे प्रमाण चांगले ठेवते. पुरुषांमधील इरेक्टाइल डिस्फंक्शनचा धोकाही दूर होतो. केशरात व्हिटॅमिन सी आणि सेलेनियम मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळं शुक्राणूंची गुणवत्ता वाढते.

शीघ्रपतनाची समस्या दूर होते

शीघ्रपतनाची समस्या दूर करण्यासाठी केशर फायदेशीर ठरते. अनेक वेळा पुरुषांमध्ये मानसिक तणावामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी कमी होते, त्यामुळे पुरुषांच्या शरीरात शीघ्रपतनाची समस्या सुरू होते. अशा परिस्थितीत केशर सेवन केल्याने मानसिक ताण कमी होऊन शीघ्रपतनाची समस्या कमी करता येते. केशराच्या सेवनाने पुरुषांमध्ये असणारी स्वप्नदोषाची समस्याही दूर होते. स्वप्नदोष ही पुरूषांमध्ये एक अशी समस्या आहे, ज्यामध्ये झोपेत असाताना अचानक शुक्राणू बाहेर येऊ लागतात.

महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेदना कमी करते

केशर स्त्रियांमध्ये सेक्शुअल इंटीमसी वाढवण्यासोबतच मासिक पाळीच्या काळात आणि प्री-मेन्स्ट्रुअल सिंड्रोम (PMS) होणाऱ्या वेदना दूर करण्यास उपयुक्त ठरते. चिमूटभर केशर दुधात घालून नियमितपणे घेतल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.

सर्दी-खोकल्यावर आरामदायी

सर्दी-खोकला झाल्यास केशराचा वापर करणं खूप फायदेशीर ठरू शकतो. केशर उष्ण असते आणि यातील अँटीऑक्सिडंट्स सर्दी-खोकला बरा होण्यास मदत करतात.

चेहऱ्याचा रंग उजळतो 

केशरामध्ये व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असतात. चेहऱ्याच्या त्वचेसाठी ते खूप फायदेशीर असतात. त्यातील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी -इंफ्लेमेटरी गुणधर्म चेहऱ्यावर मुरुम येण्यापासून वाचवतात. चेहऱ्यावरील डागही कमी होतात. याकरता केशर पाण्यात भिजवून त्यात दोन चमचे हळद घाला आणि त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.

स्मरणशक्ती वाढवते

केशराचे नियमित सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते. केशर वृद्ध व्यक्तीच्या मेंदूत अ‍ॅमायलोइड बीटा हा घटक तयार होण्यास प्रतिबंध करून अल्झायमर आणि विस्मरण होण्यापासून वाचवते. मुलांचा मेंदू अधिक कार्यक्षम ठेवण्यासाठी केशर घातलेले दूध उपयुक्त ठरते.


दम्यावर लाभदायक

केशरातील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म फुफ्फुसावरील सूज, जळजळ कमी करण्यात मदत करतात. त्यामुळे दम्याचा झटका येण्याची शक्यताही कमी होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने