अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतून आली भारतासाठी गुड न्यूज, नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक

ब्युरो टीम : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत आज सकाळीच आनंदाची बातमी दिली. नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर लांब भाला फेकला आणि अंतिम फेरीत धडक मारली. 
नीरज चोप्राने या हंगामात आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्याने दोन वेळा वैयक्ती कामगिरी सुधारणा केली आहे. १४ जून रोजी फिनलँड येथे झालेल्या पावो नुर्मी स्पर्धेत त्याने ८९.३० त्यानंतर ३० जून रोजी स्टॉकहोम येथील डायमंड लीग स्पर्धेत ८९.९४ मीटर थ्रो केला होता. अर्थात इतकी चांगली कामगिरी करून त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तेवहा एडरसन पीटर्सने ९०.३१ सह सुवर्णपदक जिंकले होते.
तसेच गेल्या वर्षी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत नीरजने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. आता या स्टार खेळाडूने जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या पात्रता फेरीत देखील कमाल करून दाखवली. पुरुषांच्या भालाफेकमध्ये एकूण ३४ खेळाडू होते. या खेळाडूंना दोन गटात विभागण्यात आले होते. दोन्ही गटातून सर्वोत्तम १२ जणांची अंतिम फेरीसाठी निवड केली गेली. आता उद्या २४ जुलै, रविवारी अंतिम फेरी होणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने