जब "खोने"के लिए कुछ भी ना बचा हो तो... असे संजय राऊत का म्हणाले ?

ब्यूरो टीम: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना आपल्या सोबत घेत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि स्वतः मुख्यमंत्री बनले. या सर्व प्रक्रियेला न्यायालयाच्या पातळीवर त्यांना झालेली मदत पाहता शिवसेनेचे  धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हदेखील काढून घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. एकीकडे ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील नगरसेवक मोठ्या संख्येनं शिंदे गटात सामील झाले आहेत तर दुसरीकडे पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंसोबत राहणार की जाणार? याविषयी आता संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे.

संजय राऊत ट्वीटमध्ये काय म्हणतात ?
    
जब "खोने"के लिए कुछ भी ना बचा हो तो "पाने" के लिए बहुत कुछ होता हैं! जय महाराष्ट्र ! असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या या ट्विटचा काय अर्थ आहे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

दरम्यान, कायद्याने जो काही लढा द्यायचा तो देऊच, पण दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आले तरी गाफील न राहता शिवसेनेला जे काही नवे चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघरी पोहोचविण्यासाठी कंबर कसा" असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना केले आहे.
 
धनुष्यबाण कोणाकडे जाणार ?
    
एकनाथ शिंदेंची वाढलेली ताकद पाहता आणि खचलेली शिवसेना पाहता शिवसेनेचे निवडणुकीसाठी वापरले जाणारे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण हे देखील शिवसेनेकडून हिसकावले जाऊ शकते. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आता हे संकट झेलण्याचाही तयारी ठेवली आहे. राज्यात या वर्षी मुंबई महापालिकेसह राज्यातील प्रमुख महापालिका निवडणुका आहेत. त्यामुळे कमी कालावधीमध्ये नवं चिन्ह पोहचवण्याचं आव्हान शिवसेनेपुढे असेल. त्यामुळे हा ठाकरे यांच्या गटासाठी एक मोठा धक्का असू शकतो. 


 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने