बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच, गुरुपौर्णिमानिमित्त एकनाथ शिंदेंनी केलेलं ट्विट चर्चेत


ब्युरो टीम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत बंड पुकारलं आणि त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. राज्यात सत्तांतर झालं असून उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांसहित एकनाथ शिंदेंवर सतत टीका होत आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी आज ट्विट करीत एकप्रकारे टीकाकारांना उत्तर दिले आहे.
शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ट्वीट केलं असून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपण त्यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात असल्याचं सांगितलं आहे. तसंच बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच असं सांगत अप्रत्यक्षपणे आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं आहे.
 शिंदे यांनी ट्विटरला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो असून बाजूला 'बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन,' असं लिहिण्यात आलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने