काय पाऊस, काय पाणी, मुंबईसाठी नॉट ओके!

ब्युरो टीम: राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.मुंबईत तर गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या  मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचलं आहे. मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. तर लोकल ट्रेनही अपेक्षित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने सुरु आहेत. मुसळधार पावसाचा लोकलच्या तिन्ही मार्गांना मोठा फटका बसला आहे. तर अनेक भागांतील रस्ते हे जलमय झालेले पाहायला मिळत आहेत.दरम्यान, त्यातच आता हवामान विभागाकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट तर दक्षिण कोकणाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर दक्षिण कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतो आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. तर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही पाहायला मिळत आहे

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने