ब्युरो टीम : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर गुजरातसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या पालखीतील साईभक्तांच्या साईनामाच्या गजराने शिर्डी दुमदुमून गेली.
आज उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाली. काकड आरतीनंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. या मिरवणूकीत संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी पोथी, संस्थानचे उपाध्यक्ष अॅड.जगदीश सावंत व विश्वस्त सचिन कोते यांनी प्रतिमा, विश्वस्त अविनाश दंडवते यांनी विणा घेवून सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे विश्वस्त सर्वश्री अॅड.सुहास आहेर, सचिन गुजर, जयंतराव जाधव, महेंद्र शेळके, डॉ.एकनाथ गोंदकर, डॉ.जालिंदर भोर, सहआयुक्त प्राप्तिकर विभाग, नासिक संजय धिवरे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान झाले. सकाळी ०७.०० वाजता श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्त विश्वस्त महेंद्र शेळके व त्यांची सुविद्य पत्नी सौ.सुरेखा शेळके यांनी सहपरिवार श्रींची पाद्यपूजा केली. सकाळी ०७.३० वाजता संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व त्यांचे पती संजय धिवरे सहआयुक्त प्राप्तिकर विभाग, नासिक यांच्या हस्ते श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलण्यात आला. यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष अॅड.जगदीश सावंत, विश्वस्त सर्वश्री अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, डॉ.एकनाथ गोंदकर, डॉ.जालिंदर भोर, सचिन कोते, मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी उपस्थित होते. गुजरातसह राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, अंधेरी, वसई, पालघर, अलिबाग, विरार, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, गेवराई, नांदेड आदी ठिकाणाहुन आलेल्या पालखीतील साईभक्तांच्या साईनामाच्या गजराने शिर्डी दुमदुमून गेली. दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. दुपारी ०४.०० ते सायं.०६.०० यावेळेत ह.भ.प.सौ.स्नेहल संतोष पित्रे, डोंबवली (ठाणे) यांचे कीर्तन झाले. सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती झाली. रात्रौ ०७.३० ते ०९.५० यावेळेत श्री.अविनाश गांगुर्डे, नासिक यांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर संपन्न झाला. हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर संपन्न झाला. रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातुन भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे विश्वस्त, अधिकारी, कर्मचारी, साईभक्त, ग्रामस्थ आणि बँड पथके मोठ्या संख्येने सहभागी झाले. रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० यावेळेत समाधी मंदिरासमोरील स्टेजवर कलाकारांच्या हजेरीचा कार्यक्रम झाला. तसेच आज उत्सवाच्या मुख्य दिवशी श्रींचे समाधी मंदिर रात्रभर दर्शनाकरीता खुले असल्यामुळे लाखो भाविकांनी श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
उद्या उत्सवाच्या सांगता दिनी गुरुवार दिनांक १४ जुलै रोजी पहाटे ०५.०५ वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पुजा होणार असुन सकाळी १०.०० ह.भ.प.सौ.स्नेहल संतोष पित्रे, डोंबवली (ठाणे) यांचा गोपालकाला कीर्तन व दहिहंडी चा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० चे दरम्यान श्रींची माध्यान्ह आरती होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते ०९.१५ यावेळेत श्री वैष्णवीस नृत्य संस्था, तेलंगणा यांचा नृत्य नाटक कार्यक्रम होईल. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल.
टिप्पणी पोस्ट करा