गोव्यात पावसाने जनता त्रस्त, अन मुख्यमंत्री स्नेहमेळाव्यात व्यस्त - कॉंग्रेसच्या विधिमंडळ गटनेत्यांची टीका

ब्युरो टीम :  संपूर्ण गोव्यात पावसाने थैमान घातले असून राज्यातील रस्ते , नागरिकांची घरे  पाण्यात बुडालेली आहेत. या पावसाने हवालदिल झालेले नागरिक सरकार कडे मदतीची याचना करत असताना  आपल्या  राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्नेहमेळाव्याचे अयिजन करतात अशी घणाघाती टिका कॉंग्रेसचे विधीमंडळ गट नेते व मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केली आहे.
राज्यात तीन महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपने बहुमतात येऊन डॉ. प्रमोद सावंत यांच्या  मुख्यमंत्री  पदाखाली  नवीन सरकार स्थापन केले आहे. त्यानिमित्त  भाजप सरकारचे  १०० दिवस पूर्ण झाल्या निमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  यांनी ६ जुलै  रोजी एका स्नेहमेळाव्याचे  आयोजन केले होते. त्यांना हे १०० दिवस साजरे करण्याचा अधिकार नसून भाजपचा निर्लज्जपण उघड पडला असेही आमदार संकल्प आमोणकर म्हणाले.


 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने