ब्युरो टीम : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ब्राम्हण महासंघाचे नेते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचं म्हणत पुणे पोलिसांकडे त्यांना सुरक्षा देण्याची मागणी केलीय. संजय राऊत यांनी ट्वीट करत यावर आपली भूमिका मांडली. या ट्वीटमध्ये त्यांनी राजस्थानमधील उदयपूरमध्ये ज्या प्रकारे हत्याकांड झालं त्याचाही उल्लेख केला. राऊतांच्या या ट्वीटवर आता पुणे पोलीस काय पावलं उचलणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
'ब्राम्हण महासंघाचे नेते, कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणानी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे. उदयपूरप्रमाणे काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे संजय राऊत म्हणाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा